Difference Between Stocks and Shares in Marathi
स्टॉक्स आणि शेअर्स हे शब्द आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा ऐकतो आणि अनेकदा ते समानार्थी वाटतात. पण खरं तर, या दोन शब्दांमध्ये सूक्ष्म फरक आहे. गुंतवणुकीच्या जगात प्रवेश करताना हा फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्टॉक्स आणि शेअर्स म्हणजे काय आणि त्यांच्यातील मुख्य फरक काय आहे, हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
स्टॉक्स
स्टॉक हा एक व्यापक शब्द आहे. जेव्हा आपण ‘स्टॉक्स‘ बद्दल बोलतो, तेव्हा आपण कोणत्याही कंपनीतील मालकी हक्काचा उल्लेख करत असतो. याचा अर्थ असा की, तुमच्याकडे एक किंवा अनेक कंपन्यांमध्ये काही प्रमाणात मालकी आहे. मात्र, तुमच्याकडे कोणत्या कंपनीचे किती शेअर्स आहेत, हे ‘स्टॉक्स’ या शब्दातून स्पष्ट होत नाही.

उदाहरणार्थ: जर तुम्ही म्हटले की “माझ्याकडे स्टॉक्स आहेत” किंवा “मी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो,” याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे कोणत्यातरी कंपन्यांमध्ये मालकी हक्क आहे. पण त्यांची संख्या किंवा विशिष्ट कंपन्यांची नावे इथे स्पष्ट केलेले नाही.
शेअर्स

शेअर्स हे स्टॉकचे विशिष्ट एकक (units) असतात. ‘शेअर’ हा शब्द वापरताना आपण एका विशिष्ट कंपनीतील मालकीच्या हिश्श्याबद्दल बोलतो. म्हणजेच, तुमच्याकडे त्या कंपनीचे किती युनिट्स (शेअर्स) आहेत, हे तुम्ही स्पष्टपणे सांगता.
उदाहरणार्थ: जर तुम्ही म्हटले की “माझ्याकडे TMT कंपनीचे 50 शेअर्स आहेत”, याचा अर्थ स्पष्टपणे तुमच्याकडे TMT कंपनीच्या एकूण मालकीपैकी 50 युनिट्सचा मालकी हक्क आहे.
स्टॉक्स आणि शेअर्समधील मुख्य फरक:
स्टॉक्स आणि शेअर्स या मधील मुख्य फरक म्हणजे स्टॉक हा कोणत्याही कंपनीतील मालकी हक्क दर्शवतो. (जो एक किंवा अनेक कंपन्यांचा असू शकतो) आणि शेअर हा एका विशिष्ट कंपनीतील मालकी हक्काचा एक भाग किंवा युनिट दर्शवतो.
What is Difference Between Stocks and Shares in Marathi |What is Stocks | What is Shares | Difference Between Stocks and Shares |